Someshwarnagar | वीर नारी व गुणवंतांचा सत्कार करीत सोमेश्वर येथे आजी माजी सैनिकांचे ध्वजारोहण..!


 सोमेश्वर नगर | प्रतिनिधी 

                बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा द्वारे वीर नारी कुसुम शेंडकर ,पदोन्नती झालेले पोलिस उपनिरीक्षक दीपक वारुळे व इतर गुणवंत यांचा सत्कार करीत बारामती तालुका आजी माजी सैनिकांनी उत्साहात ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. या सैनिक संघटनेचे  कार्य समाजाला नैसर्गिक असो अथवा इतर कोणत्याही संकटात कायम आधारस्तंभ ठरला आहे. आयुष्यभर सेनादलात नोकरी करून निवृत्तीनंतर देखील अखेरपर्यंत समाजसेवा या संघाद्वारे चालू ठेवण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.


    सैनिक संघाद्वारे आज संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांना श्रद्धांजली वाहून  वीर नारी कुसुम शेंडकर, पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याबद्दल दिपक वारुळे व गुणवंतांचा सत्कार करून ध्वजारोहण कार्यक्रम येथे पार पडला. सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,उपाध्यक्ष मिलिंद कांबळे,संचालक शैलेश रासकर,ऋषिकेश गायकवाड, मा संचालक बाळासाहेब गायकवाड,बारामती सराफ संघटनेचे अध्यक्ष किरण आळंदीकर,उद्योजक दीपक साखरे, राजेंद्र दुर्वे,संतोष कोंडाळकर,शिवाजी शेंडकर,सुखदेव शिंदे पो उपनिरीक्षक राहुल साबळे,पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, यांचेसह सरपंच पूजा गायकवाड व मां सरपंच वैभव गायकवाड यांचेसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


     प्रास्ताविकामधे ॲड गणेश आळंदीकर यांनी सैनिकांचे शेकडो तंटे पोलिस स्टेशन अथवा न्यायालयात न जाता सामोपचाराने मिटविले असल्याचे सांगून संस्थापक जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाने व सैनिकाच्या सहकार्याने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

     सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर व सोमेश्वर स्पोर्ट्स अकादमी चे अध्यक्ष भाऊसो लकडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी ऑन ड्युटी सैनिक  मोहन गायकवाड यांचे वतीने अल्पोपहार देणेत आला. संघटनेचे उपाध्यक्ष भगवान माळशिकारे, रामचंद्र शेलार, गणेश शेंडकर,राजाराम शेंडकर,दत्तात्रय चोरघे, लहू होळकर,मीनानाथ होळकर ,राजेंद्र पवार,विजय साबळे,बाळासाहेब गायकवाड यांचेसह सुमारे ५० आजी माजी सैनिक यावेळी उपस्थित होते,तर आभार भगवान माळशिकारे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments